top of page

मालवणी लोकांची भेट


आपल्या जीवनातील काही गोष्टी योगा योगान बदलूक शकतत. उदाहरणार्थ नाणे फेकी, गाडीचो ब्रेक मारणे किंवाह शेर्जारच्यानी केलेली लागवड. कोंकणात काही पाणमांजर संशोधकांका भेटलय तेव्हा अशोच काही गोष्टी माझ्या समोर इल्यो.


मी सहजच शेती आणि शेती करुक जे जे त्रास काडूचे लागतत ह्या बद्दल बोला होतय. सहयाद्री आपली सुंदर असाच पण पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पोचूक दोन तास चढण काडून जावचा लागला तेव्हा कोकणी माणसाचा कोकणात जीवन किती कष्टदायक असू शकता ह्या मका जाणवून इला.


नित्य रिव्हर ऑटर कॉन्सर्व्हव्हेनसी (पणमांजरांची सवरक्षण करणारे) ह्या स्वंस्थेचे संशोधक मल्हार आमच्या बरोबर होते. आमच्या गोष्टींचे भाषान्तर तेच करून दित.

रमेश नांवाचो इसम जो माझ्या बरोबर होतो तो भाताची लागवड करता. तेचि जमीन अश्या जागी आसा जेका मायरिस्टिक स्वेम्प (दलदल) म्हणतत. ह्या एक प्राचीन काळीन जंगल असा. आणि सह्याद्रीत ह्या प्रकारच्या जंगलाचा अस्तित्व अतिशय धोक्यात असा.


मी रमेशाक विचारलाय, "तुम्ही भातासाठी बियाणं खयचा वापरतात स्थानिक कि हायब्रीड?", तो म्हणालो "हायब्रीड. पण आता मी आपला स्थानिक बयाण वापरतलय. पूर्ण आयुष्य मी कधी शिक पडाक नाय कारण आदल्या दिवशीची पेज सकाळी जेव होतंय. आता सर्दी काय आणि खोकलो काय. ओप्रेशन पण झाला. ह्या हायब्रीड बियाण्यात काय दम नाय.



"मी विचारलंय, "हायब्रीडचा उत्पन्न जास्त भेटता काय?"

"पहिल्या वर्षाक नाय. कृषी विभागवाल्यानी सांगितला चार पटीनी उत्पन्न वाढता म्हणान. तसा काय होऊक नाय. दुसऱ्या वर्षी परत नवीन बियाणा घेवचा इला. ह्या अगोदर अशी काय पाळी येऊक नाय. कृषी विभागवाले म्हणूक लागले तुम्ही आमचा खत वापरुक नाय म्हणून तुमचा उत्पादन कमी."

त्यानंतर मी रासायनिक खत वापरलय आणि आणि उत्पन्न वाढला. पण त्या मूळे इतर बदल दिसान इले, बेडूक आणि कीटक माझ्या शेतात किंवा दलदलातही इतके दिसा नव्हते.


आम्ही ओहोळाच्या तोंडाक पोचलोव. जंगलाच्या बरोबर मदोमद. लहान (हलदरिया) जातीचे माशे, बारीक सुंगटा, खेकडे इत्यादी पाण्यात दिसान इले. चिखलात पंज्याचे खूण होते. रमेश म्हणालो बहुतेक वाघ भेकरया पाठी होतो.

ह्या मायरिस्टिक स्वेम्प (दलदल) आणि हे ओहळ लहान असले तरी तिलारी नादिक अतिशय महत्वाचे. महासीर मासो जेका आम्ही खडस म्हन्तोव. ह्या माश्याचे वास्तव्य ह्या पाण्यात असता. लागवडीत भयंकर प्रमाणात बदलाव आणल्या मुळे पाणी पुरवठ्या वर ताण पडता. ज्या जमिनीवर अगोदर काजू ची झाड लावत आता तिकडे अननसाची लागवड चालू झालीसा. आता जिकडे अननसाची लागवड तिकडे रासयनिक खत आणि अपार पाणायचो वापर. ह्याच नाय तर आता जमिनी गाववाल्याकडून विकत घेऊन मोठ्या कम्पनिक नाय तर परदेशीयांका विकून टाकतत.


लहान माश्याची पिल्ला


नदीत जेव्हा मशे मारी कमी होवूक लागली तेव्हा गावातल्या सरपंच पराशेरांका काळजी झाली. शोध घेतल्यावर समजला कि पावसाळ्यात जेव्हा माशाचो प्रजनन काळ असता तेव्हा पण अंधाधुन मशे मारी चालू असता.



पंचायतीन म्हणान बैठक घेऊन निर्णय घेतलो कि एका एका घराण्यात ह्या काळात मशे मारी काटा काम नये. ह्यामुळे लहान मासो शेतातसुन ओहळात आणि ओहळासुन नदीत जातोलो.



आतापर्यन्त तरी गावकरयांनी चांगलो प्रतिसाद दिलो आसा. जी जी घारा ह्या पराक्रमात भाग घेतात तेनका शेजारी तेंच्या माशयाचो भाग दितत. ह्या पराक्रमात सगळे गाववाले सहभागी आसात आणि चांगलो प्रतिसाद दितत म्हणून ह्या शक्य झाला असा.


भूत बंगले


एके दिवशी आम्ही सरपंच पराशेरांका भेट दिवूक गेलो. वाटेत काहीशी घरांची रांग लागलली दिसली. सगळी कोसळान पाडलेली. कोण रावा नाय होतो म्हणान दाट जंगल झाला होता.



मी प्रविणक विचारलंय ह्या काय होता म्हणान?

तो म्हणालो हैसर जेव्हा धरणाचा बांदकाम चालू होता तेव्हा ही घारा बांधली. त्या कंपनी वाल्यानी सांगितल्यान वीज पुरोवठो चालू झालो की खुप लोकांका नोकरी भेटतली. बाहेर गावची लोका येताली. आणि सगळ्यांका नोकरी भेटतली. खरा तर जी लोका इकडे धरण बांधूक इली तीच लोका इकडे रवत काम सम्पल्यार मुक्काम दुसरीकडे. आता हायसर झाळकट वाढता.


मोठो मासो


माझ्या शेवटच्या दिवशी मी नदीकडे गेलंय. महासीर (खडस) खय दीस्तातर बागूक.असा वाटता ह्या पाण्यात ( तोर मलबारिकस) खडस माश्याची प्रजाती इकडे होऊ शकता कारण ह्या जातीच्या माश्याची उत्तर श्रेणी असणा साहजिक आसा. नाही तर मोठे खडस वैतरणा आणि सावित्री नदीचे पण असू शकतत. माझ्या मते नर्मदा नदीचे खडस आणि हे खडस एकाच प्रजातीचे. पण मी जे इकडचे खडसाचे फोटोत बघितलंय ते नर्मदा, वैतरणा किव्हा नर्मदा नदीतले असण्याची शक्यता कमी वाटता.

या परिसरात धरण बांधल्यान म्हणान, स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागा 'ब्लू क्रांती' कार्यक्रमाचो भाग मानतात. हेचो उद्देश काय की, ग्रामीण भागात माशाच्या सेवनात भर घालूक, माशांची संख्या अधिक वाढवची. तत्त्वतः एक चांगली कल्पना: पण खरा म्हणजे ह्या जलाशयात विलायती मशे सोडण्याचो एक कट. आणि अश्या नदीत जेची जैवविविधता अगोदरच धोक्यात आसा.


ऑक्टोबर महनियत नदीचा पात्र फार खाली होता. आणि एक हफ्त्या अगोदरच पावसाळो समपान गेलो होता. जवळ पास मी (लहान रसबोरा) जातीचे माशे बघितलंय आणि काही काळ नदीच्या आजू बाजूक पक्ष्यांवर नजर मारलंय. कोणीतरी मरल धरूक गरी लावलवी, त्यात अइस साठी "पूंतीस" जातीचो मासो लावलो होतो. ह्या सगळा चालू असताना डोक्यावर एक घार फिरा होती, वेळ भेटल्यास तो मासो उचलून घेऊन जाणारी.




मी आणि प्रवीण चार तास हाडे तडेन फिरलो. नंतर जेवण करून घराकडे इलोव. जेवणात भात आमटी आणि कोकम काडी होती. जेवण झाल्यार तुमका काकू खय माशे धरता तिकडे घेऊन जातंय, असा प्रवीण म्हणालो.


हिम्मत होई


दोन तास जेवण करता म्हणसर धरणाचा पाणी सोडला. बांद सोडल्या मुळे पाण्याची पात्र एक मीटर तरी वडली होती. भेन्दूलगी नदीच्या काटार उभी रवान लामारी मारून उभी होती. म्हणाक लागी कोंबडीची आतडी खडस गरवक चांगली. मी आताच बारीक सारीक मशे आणि एक खडस धरलय. प्रवीण माझ्या साठी भाषांतर करून सांगा होतो तेवढ्यात तिनी पाण्यातसुन बालडी भायर काढली आणि त्याच्यातसून किलो भाराचो खडस आणि गोड्या पाण्यातले केण व इतर लहान सान मासो दाखयलो. काहींची तर मका ओळख पण नाय होती. कदाचित हे माश्यानचो अजून कोणी शोध पण लावूक नसतॊलो.


हेचे बाजारात ५०० रुपय मेळतले. खडस दाखय्त म्हणाली.



मी तिका विचारून त्या खडसाचे फोटो काढलय. भेन्दूलगी म्हणाक लागली मी आणि माझो घरकार आम्ही लहान ते माशे खातो आणि खडस बाजारात विकतो. दर दिवशी ती काही तसांका मशे गरौक बसता, जेवणा पूर्ती भेटले की भागता. नदी किनार्याक तिची लहान जागा आसा त्यात भाजी पाल्याची लागवड करून तेनचो निवारो चलता.


आमचे गाजली चालूच होतयो, तेव्हा मी आमच्या दोघांच्या जीवना बद्दल बोलताना समजून इला भेन्दूल्जिक स्पेन बद्दल (जिकडे मी रवतय) बराच काय ठाऊक होता. स्पेनच नाय तर युरोप बद्दल पण बराच माहित आसा.मी तिका विचारलय, येवडा कसाकाय ज्ञान तिका त्या देशाचा? ती हसत म्हणाली, "मी खडस विकून मुलीक विद्यापीठात शिक्षण दिलय आणि आता ती युरोपात नोकरी करता.


सुदैवान ही नदी इतक्या घराण्यांचो सांभाळ करता आणि ह्या नदीयेर इतक्या परिवारांचा जीवन अवलंबून आसा. जो पर्यंत ह्या नदीवर अवलूंबून असणाऱ्या लोकांनी तिचो सांभाळ केलो तो पर्यंत पुढे तुमचा आणि ह्या नदीचा जीवन चांगला आणि सुखरूप रवताला. नदी काठी रवणाऱ्या अश्याच लोकांमुळे आणि तेंच्या मेहनतीक लगान आम्ही ह्यो नदी वाचवूक शकतो. आणि अश्या ह्या परिवारामुळे काही स्थानिक सरकारी आणि व्यावसायिक संस्थेचो अडचणी जरी इल्यो तर त्यो सोडवून शकतो. माझ्या मते अश्याच प्रकारे हे समुदाय जे नदी काठी रवतत तेंच्या आधारानेच आणखी दुसऱ्या नद्यांचा संवर्धन करुक शकतो.




99 views

Recent Posts

See All

Comments


bottom of page